For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोमॅटो-पेटीएमची करारावर स्वाक्षरी

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
झोमॅटो पेटीएमची करारावर स्वाक्षरी
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

प्रसिद्ध खाद्य वितरण कंपनी झोमॅटोने पेटीएमचा मोठा व्यवसाय विकत घेत आहे. खरं तर, झोमॅटोने पेटीएमचा मनोरंजन तिकीट व्यवसाय खरेदी केला असून या दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार 2,048 कोटी रुपयांचा आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने एक्सचेंज फाइलिंग दरम्यान याची घोषणा केली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘आम्ही आता आमच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करताना फायदेशीर मॉडेल विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करू.’ ‘आम्ही पेटीएमसाठी दीर्घकालीन योजना तयार केल्याचे ते म्हणाले.’

मागील काही काळापासून आपण अनेक आव्हानांचा सामना केला आहे. आता आम्ही त्या धक्क्यातून सावरलो आहोत आणि पुढे जाण्याच्या तयारीत आहोत. पेटीएमचे कर्मचारीही झोमॅटोमध्ये सामील होतील. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की ती झोमॅटोला 100 टक्के हिस्सा विकणार आहे. हा करार रोख मुक्त आणि कर्जमुक्त मॉडेलवर आहे. याशिवाय पेटीएमच्या एंटरटेनमेंट तिकीट बिझनेस टीममध्ये काम करणाऱ्या 280 कर्मचाऱ्यांनाही झोमॅटोमध्ये ट्रान्स्फर केले जाईल.

Advertisement

तथापि, चित्रपटाची तिकिटे, खेळ आणि कार्यक्रमांची तिकिटे पेटीएम अॅपवर पुढील 12 महिने उपलब्ध राहतील. पेटीएमने तिकिटन्यू आणि इन्सीडर 268 कोटी रुपयांना खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मनोरंजन तिकीट व्यवसायातून नवीन अॅप तयार केले जाईल. झोमॅटोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रस्तावित अधिग्रहणामुळे आम्हाला या विभागातील आमच्या ग्राहकांना अधिक प्रमाणात जोडण्यात मदत होईल.

Advertisement
Tags :

.