For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोमॅटोचे सीईओ गोयल यांचा राजीनामा, ढिंडसा नवे सीईओ

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
झोमॅटोचे सीईओ गोयल यांचा राजीनामा   ढिंडसा नवे सीईओ
Advertisement

इटर्नलची शेअरबाजाराला माहिती, तिमाही निकाल घोषित

Advertisement

वृत्तसंस्था/बेंगळूर

फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी झोमॅटो म्हणजेच इटर्नलचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी समूहातील सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर आता अलबिंदर ढिंडसा यांची नियुक्ती झाली आहे. झोमॅटोने यासंदर्भातली माहिती शेअर बाजाराला दिली आहे. नव्या जोखीमयुक्त कल्पनांवर काम करण्यासाठी आपण सीईओ पदाचा राजीनामा दिलेला असून यासारख्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी आपल्याला कंपनीमधून बाहेर पडणे योग्य वाटले आहे, अशी त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गोयल म्हणाले की मी आपल्या आयुष्यातील जवळपास 18 वर्षे या कंपनीमध्ये दिलेली आहेत. दीर्घकालीन धोरण, संस्कृती आणि नेतृत्व विकासावर यापुढेही आपण लक्ष देणार आहे. असं जरी असलं तरी दीपिंदर गोयल हे उपाध्यक्ष म्हणून राहणार आहेत. दीपिंदर गोयल यांनी सीईओ पद सोडलेले असले तरी ते पूर्णपणे कंपनीमधून बाहेर पडलेले नाहीत. समभागदारांची मंजुरी मिळताच ते कंपनीच्या संचालक मंडळावर व्हाईस चेअरमन म्हणून काम करतील.

Advertisement

इटर्नलचा तिमाही निकाल

याच दरम्यान झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून कंपनीने यादरम्यान 102 कोटींचा नफा प्राप्त केला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 73 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागच्या वर्षी कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत 59 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. कंपनीने याच तिमाहीमध्ये 16315 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये पाहता हा महसूल 202 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 5405 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.

विविध क्षेत्रात गुंतवणूक

मिळालेल्या माहितीनुसार स्पेस-टेक, हेल्थ क्षेत्रामध्ये गोयल यांनी वैयक्तिक गुंतवणूक केलेली आहे. यात स्पेसटेक कंपनी पिक्सेलमध्ये जवळपास त्यांनी 210 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय आरोग्य क्षेत्रातील कंटिन्यू आणि एव्हिएशन क्षेत्रातील एलएटी एरोस्पेस सारख्या कंपन्याही ते सांभाळत आहेत.

Advertisement
Tags :

.