For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोमॅटो-ब्लिंकिटची मूळ कंपनी इटर्नल ‘डार्क एआय’ अॅप आणणार

07:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
झोमॅटो ब्लिंकिटची मूळ कंपनी इटर्नल ‘डार्क एआय’ अॅप आणणार
Advertisement

कंपनीचे प्रमुख दीपेंद्र गोयल यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

झोमॅटो आणि ब्लिंकिट चालवणारी इटर्नल कंपनी ‘डार्क.एआय’ नावाचे नवीन एआय अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मालक दीपेंद्र गोयल यांनी सांगितले की, या अॅपमध्ये तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय तुमचे गुप्त विचार शेअर करू शकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये तुमची चॅट कुठेही सेव्ह होणार नाही आणि तुमची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहील. सध्या, कंपनीचे कर्मचारी त्याची चाचणी करत आहेत. गोयल यांच्या मते, डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील या हमीमुळे, ते कोणत्याही काळजीशिवाय आपले सखोल संशोधन, वैयक्तिक माहिती आणि कठीण प्रश्न शेअर करू शकतील.

Advertisement

कंपनी तुमची चॅट वाचणार नाही

गोयल म्हणाले की, डॉर्कएआय हे अॅप कंपनी स्वत:च्या संगणक प्रणाली आणि सुरक्षित तंत्रज्ञानावर चालवेल. त्यात अशी सुरक्षा (एंड-टू-एंड एक्रिप्शन) असेल की तुमची माहिती फक्त तुमच्याकडे आणि अॅपमध्येच राहील. याशिवाय, त्यात एक विशेष मेमरी सिस्टीम देखील असेल, जी तुमच्या नियंत्रणाखाली असेल. म्हणजेच, तुम्ही तुमच्या जुन्या संभाषणाची माहिती तुम्हाला पाहिजे तेव्हा सेव्ह करू शकता आणि पाहिजे तेव्हा डिलीट करू शकता.

संस्थापक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी उपयुक्त

हे अॅप विशेषत: स्टार्टअप मालक, शास्त्रज्ञ, संशोधक, मोठ्या कंपन्या आणि सरकारी कार्यालयांसाठी डिझाइन केले आहे, ज्यांना आपले काम गोपनीय ठेवण्याची गरज असते. गोयल म्हणाले की, हे एआय तुम्हाला खूश करण्यासाठी तुमच्याशी गोड बोलणार नाही. ते अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, त्याला जे सत्य वाटते ते ते तुम्हाला सांगेल.

सध्याच्या एआय साधनांवर प्रश्नचिन्हाची गरज का?

एआय कंपन्यांमधील डेटा चोरी आणि गोपनीयतेबद्दल गोयल म्हणाले की, लोकांनी अॅप सेटिंग्जमध्ये ‘ऑप्ट-आउट’ केले तरी, बॅकएंडवर त्यांच्या डेटाचे काय केले जात आहे हे स्पष्ट नाही तो म्हणाला, ‘आता जेव्हा आपण एआय अॅप्स वापरतो, तेव्हा आपल्या मनात नेहमीच एक लहानशी भीती असते की कोणीतरी, कधीतरी, आपली चॅट वाचू शकेल. याच भीती आणि अविश्वासामुळे लोक एआयचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीत.’

Advertisement
Tags :

.