For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका

06:05 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका
Advertisement

वृत्तसंस्था/ हरारे

Advertisement

झिम्बाब्वे क्रिकेटने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवशीय आंतरराष्ट्रीय मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका सप्टेंबरमध्ये खेळली जाणार असून एका दशकाहून अधिक कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ या आफ्रिकन देशाच्या दौऱ्यावर एकदिवशीय मालिका खेळयासाठी जाणार आहे.

या मालिकेची सुरूवात 15 सप्टेंबर रोजी होईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 18 आणि 20 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हे सर्व सामने राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित केले जातील. या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 2014 मध्ये एका तिरंगी मालिकेत (ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघही सहभागी होता) झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवशीय मालिका खेळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची द्विपक्षीय एकदिवशीय मालिका खेळण्यापूर्वी झिम्बाब्वेचा संघ जुलैमध्ये भारतीय संघाचेही टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमनापद भूषवणार  आहे.

Advertisement

झिम्बाब्वेसाठी ही आगामी मालिका 2027 च्या आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या स्पर्धेचे यजमानपद ते दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया यांच्यासह संयुक्तपणे भूषविणार आहेत. झिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक गिव्हमोर माकोनी यांनी एका अव्वल दर्जाच्या संघाच्या पुनरागमनाचे स्वागत केले आणि या मालिकेचे वर्णन संघाच्या विकासासाठी एक मौल्यवान संधी, असे केले.

ऑस्ट्रेलियाचे पुन्हा एकदा झिम्बाब्वेमध्ये स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, ही मालिका अत्यंत चुरशीची ठरेल अशी आम्हाला खात्री आहे. एक संघ म्हणून आमच्या प्रगतीसाठी अशा उच्च दर्जाच्या सामन्यांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे माकोनी यांनी आयसीसीच्या हवाल्याने सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, झिम्बाब्वे 2027 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना ही मालिका त्यांना सामन्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देईल. तसेच स्थानिक चाहरत्यांनाही उच्च दर्जाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी यामुळे मिळेल. आमच्या चाहत्यांना घराच्या मैदानावरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वोच्च दर्जा अनुभवण्याची ही एक शानदार संधी आहे आणि हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आम्हाला चाहत्यांचा जोरदार पाठिंबा मिळेल, अशी आम्ही अपेक्षा करतो, असेही त्यांनी नमूद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची द्विपक्षीय एकदिवशीय मालिका खेळण्यापूर्वी झिम्बाब्वेचा संघ जुलैमध्ये भारतीय संघाचेही टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी यजमनापद भूषवणार  आहे.

Advertisement
Tags :

.