For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युगांडाकडून झिंबाब्वेचा पराभव

06:21 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
युगांडाकडून झिंबाब्वेचा पराभव
Advertisement

वृत्तसंस्था/ विंडहॉक (नामिबिया)

Advertisement

आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी सुरू असलेल्या आफ्रिया विभागीय स्पर्धेतील येथे रविवारी झालेल्या सामन्यात युगांडाने झिंबाब्वेचा 5 गड्यांनी पराभव करत महत्त्वाचे दोन गुण मिळविले. आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 सांघिक मानांकनात युगांडा 23 व्या स्थानावर आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने 20 षटकात 7 बाद 136 धावा जमविल्या. त्यानंतर युगांडाने 19.1 षटकात 5 बाद 138 धावा जमवित हा सामना 5 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी जिंकला. या सामन्यातील विजयामुळे युगांडाने या पात्र फेरीच्या स्पर्धेतील गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले आहे. या तक्त्यामध्ये नामिबिया पहिल्या, केनिया दुसऱ्या तर झिंबाब्वे चौथ्या स्थानावर असून त्यांनी केवळ दोन गुण मिळविले आहेत. या सामन्यात झिंबाब्वेच्या डावात कर्णधार सिकंदर रजाने 48 धावा जमविल्या. युगांडाच्या दिनेश नाकरानीने 14 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर युगांडाने 19.1 षटकात 5 बाद 138 धावा जमवित हा सामना जिंकला. युगांडाच्या डावात रिझात अली शहाने 42 तर अल्फेश राजमानीने 40 धावा जमविल्या.

Advertisement

संक्षिप्त धावफलक - झिंबाब्वे 20 षटकात 7 बाद 136, युगांडा 19.1 षटकात 5 बाद 138.

Advertisement
Tags :

.