कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

04:32 PM Apr 09, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा : 

Advertisement

असंसर्गजन्य आजाराअंतर्गत हायपरटेन्शन अॅण्ड डायबेटीस कॅन्सर या आजारांची नॅशनल एनसीडी पोर्टलवरील आकडेवाडीमध्ये तपासणी (स्क्रिनिंग), निदान (डायग्नोसिस, फॉलोअप, ऑडिअन्स) हे निकष लावून प्राप्त गुणांनुसार उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास महाराष्ट्र राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचा स्वीकार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आरोग्य विभागच्या मान्यवरांनी केला. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हेही उपस्थित होते. कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात सह संचालक, कुष्ठरोग विभाग सातारा यांना राज्यात द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.

Advertisement

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्तम कामगिरी करणारे जिल्हे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणारे रुग्णालय, जास्त प्रसूती करणाऱ्या आरोग्य संस्था, आरबीएसके पथकातील उत्तम कामगिरी करणारा जिल्हा, असंसर्गजन्य आजारांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, सिकल सेलमध्ये उत्तम कमगिरी करणाऱ्या संस्था, उत्तम कामगिरी करणारे एसएनसीयू, उत्तम कामगिरी करणारे आयसीयू तसेच गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या मार्गदर्शनामध्ये असंसर्गजन्य आजारांतर्गत हायपरटेन्शन अॅण्ड डायबेटीस कॅन्सर या आजारांची नॅशनल एनसीडी पोर्टलवरील आकडेवाडीमध्ये तपासणी (स्क्रिनींग), निदान (डायग्नोसिस, फॉलोअप, ऑडिअन्स) हे निकष लावून प्राप्त गुणांनुसार उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याच बरोबर कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात सह संचालक, कुष्ठरोग विभाग सातारा यांना राज्यात द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.

विधान परिषद सभापती राम शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याकरीता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा यांचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, डॉ गितांजली टकले, दिव्या परदेशी हे उपस्थित होते. तसेच कुष्ठरोग विभागामार्फत पुरस्कारासाठी सहा. संचालक डॉ. राजेश गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article