For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा परिषद अध्यक्षांची विकासकामांबाबत बैठक

04:13 PM May 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जिल्हा परिषद अध्यक्षांची विकासकामांबाबत बैठक
Advertisement

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी केले जि. प अध्यक्षांचे स्वागत

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत प्रमोद कामत यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह सरपंच प्रियांका सावंत , उपसरपंच संदेश केरकर, पुरुषोत्तम शेणई यांनी भेट घेत अभिनंदन केले . दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तिरोडा माऊली मंदिर तलाव संवर्धन , तिलारी पाणी व्यवस्थापन , जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा , खाशेवाडी व रेडी यांना जोडणारा साकव यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. पुंड मॅडम तसेच चीफ एक्झिक्यूटिव्ह सुदेश राणे, पाणीपुरवठाचे राजेंद्र सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब आदींशी या संदर्भात चर्चा करण्यात आली . यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी तिरोडा - शिरोडा पाण्याचा प्रश्न , रेडी नाणोस आणि तिरोडा यांना जोडणारा साकव प्रश्नावर त्वरित कार्यवाही करावी असे आदेश दिले . या बैठकीबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त करून प्रमोदजी कामत यांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.