कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जि.प.अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

10:51 AM Sep 13, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण प्रारुप रचनेबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी (महिला) खुले झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत आता अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

Advertisement

जिल्हा परिषदेचा गट व गणांचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला नसून नवीन प्राऊप आराखड्यानुसार 74 गट व 148 गण यंदाच्या निवडणुकीसाठी राहणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागात राजकीय वारे वाहू लागले आहेत. मध्यंतरी नव्या रचनेनुसार वाढलेल्या 7 गट आणि 14 गणात इच्छुकांनी तशी तयारी सुरू केली होती. मात्र आता जुन्याच रचनेनुसार निवडणूक होण्याची संकेत असल्याने आता इच्छुकांना जुन्या गटातील व गणातील गावे लक्षात घेवून तशी मोर्चेबांधणी करण्याकडे लक्ष वेधले होते. दोन वर्षापूर्वी 62 गट आणि 124 गणांनुसार काढलेली आरक्षण सोडत रद्द होऊन पूर्वीच्या 55 आणि 110 गणांनुसार निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूकही पुढील दोन-तीन महिन्यात लागण्याची शक्यता आहे. यासाठी गट आणि गणांची प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली. त्यावर घेण्यात आलेल्या हरकतींवर सुनावणीही पार पडली. आता 56 गट तर 112 गण झाले आहेत. विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर अंतिम गट आणि गणरचना अवलंबून आहे. यावर लवकरच निर्णय होईल. त्यानंतर मतदार संघातील आरक्षण जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाने नवीन गट व गण रचना केल्यानंतर ग्रामस्थांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. एकूण जिल्हाभरातून 50 हरकती नोंदवल्या गेल्या. यामध्ये विशेष म्हणजे 35 हरकती या नाव का बदलले, यासाठीच होत्या. मुळात या पुनर्रचनेत ज्या महसूल गावाची मतदार संख्या जास्त असेल, त्या गावाचे नाव त्या गटाला दिले गेले. परंतु अनेक पुढाऱ्यांना हे गटाचे नावच पसंत न पडल्याचे दिसून आले. मात्र याबाबत राज्य सरकारकडून अजूनही घोषणेची प्रतीक्षा राहिली आहे. आता जि.प.चे अध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी खुले झाल्याने या पदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपद मिळवण्यासाठी आतापासूनच इच्छुकांकडून प्रयत्न सुऊ होणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 9 सभापतीपदासाठीही आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी 1, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3 आणि महिला प्रवर्गासाठी 4 पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article