स्वच्छतेसाठी जिल्हापरिषदेचे कर्मचारी सरसावले
रत्नागिरी :
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राज्य शासनाने निश्चित करून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घमेले घेत आवारात स्वच्छता केली.
जिल्हा परिषद भवन परिसरात मंगळवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कार्यालय व परिसर चकाचक करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी कार्यक्रम
निश्चित करून दिला आहे. या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या १०० दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामांसदर्भात कार्यवाहाचे आदेश दिले आहेत.