For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Zilla Parishad sports | सांगलीत जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात

04:59 PM Mar 12, 2026 IST | NEETA POTDAR
sangli zilla parishad sports   सांगलीत जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात
Advertisement

                      सांगली जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

Advertisement

सांगली - खेळाडूंच्या मागणीनुसार यंदा टेबल टेनिस, बॅडमिंटनसह काही नव्या खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे. आवश्यक क्रीडा साहित्यही उपलब्ध करून दिले आहे. भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या सूचनांनुसार क्रीडा स्पर्धाचे नियोजन करण्यात येईल. सांगली जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात समृद्ध परंपरा आहे ही परंपरा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले.

जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांतील पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, कडेगाव पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, तासगाव पंचायत समितीच्या सभापती अरुणा महेश पाटील, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी प्रास्ताविक केले.

Advertisement

सभापती जितेश कदम म्हणाले, सीईओविशाल नरवाडे यांच्या पुढाकारामुळे कर्मचायांना दैनंदिन कामकाजातून थोडी मोकळीक मिळून आरोग्यदायी वातावरण निर्माण होत आहे. स्पर्धाचे नियोजन शिस्तबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.स्पर्धाचाक्रीडा स्पर्धांबरोबरच शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील स्पर्धकांना त्यात संधी देण्यात आली आहे.

आनंद सर्वांना घरबसल्या घेता यावा यासाठी यंदा लाईव्ह यूट्यूब प्रसारणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उ‌द्घाटनावेळी राजारामबापू मिलिटरी स्कूल अकॅडमी, ईश्वरपूरच्या मिलिटरी पायपर बँडने आकर्षक संचलन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Advertisement
Tags :

.