For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता

02:06 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता
Advertisement

                     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

Advertisement

कोल्हापूर : लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद आणिपंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेर घ्यायच्या आहेत. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांना विलंब होण्याची शक्यता आहे. मागील आठवडयात राज्य निवडणूक आयोगाने याबाबत आढावा घेतल्याची चर्चा होती.

Advertisement

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची लगबग वाढली होती. आता महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर साधारण १९ जानेवारी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होऊन फेब्रुवारी महिन्यात मतदान आणि मतमोजणी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.