For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झेटवर्कचा 4200 कोटेंचा आयपीओ

06:10 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
झेटवर्कचा 4200 कोटेंचा आयपीओ
Advertisement

मुंबई:

Advertisement

झेटवर्क या कंपनीने आपला आयपीओ आणण्याचे निश्चित केले असून या संदर्भातला अर्ज बाजारातील नियमाककडे सादर केला आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 4200 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या वर्षाअखेर शेअरबाजारात कंपनीचा समभाग सादर करण्याची योजना बनविली जात आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्सीयल, अवेंडर्स कॅपिटल, पँन्टोमॅथ कॅपिटल या सोबतच एचएसबीसीची भारतीय सहाय्यक कंपनी मॉर्गन स्टॅन्ले व गोल्डमॅन सॅक्स यांना आयपीओ व्यवस्थापनाची जबाबदारी कंपनीने दिली आहे.  आयपीओ सादरकरणापूर्वी कंपनी 450 ते 500 कोटी रुपये उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या कंपनीमध्ये खोसला व्हेंचर्स, बॅली गिफोर्ड व इंडिगोचे संस्थापक राकेश गंगवाल यांची गुंतवणुक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.