महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादविरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण ः गृहमंत्री

06:47 AM Mar 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीआयएसएफचा 54 वा स्थापना दिन ः

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी हैदराबादमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 54 व्या स्थापना दिन सोहळय़ात भाग घेतला आहे. गृहमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकॅडमीमध्ये बैफल रेंज ‘अर्जुन’चे उद्घाटन केले तसेच सीआयएसएफ जवान आणि अधिकाऱयांना संबोधित केले आहे. मोदी सरकारचे दहशतवाद अजिबात सहन न करण्याचे धोरण धोरण आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

देशाच्या कुठल्याही हिस्स्यात फुटिरवाद, दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांना कठोरपणे हाताळले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे व्हिजन सादर केले आहे, याकरता बंदर, विमानतळ इत्यादींची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे. सीआयएसएफने स्वतःच्या स्थापनेचे सर्व उद्देश मागील 53 वर्षांमध्ये पूर्ण केले आहेत. देशासमोर 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य असून ते गाठण्यासाठी विमानतळ, बंदर, रेल्वेमार्ग, औद्योगिक केंद्रांची सुरक्षा महत्त्वपूर्ण असल्याचे शाह म्हणाले.

बंदर, विमानतळांच्या सुरक्षेसाठी आगामी काळात सर्व तंत्रज्ञानांसोबत सीआयएसएफला मजबूत केले जाणार आहे. सेवेदरम्यान अनेक सीआयएसएफ जवानांनी सर्वोच्च बलिदान केले आहे. सीआयएसएफमुळे नक्षलवादी आणि दहशतवादी नियंत्रणात असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

हैदराबादमध्ये अमित शाह यांच्या दौऱयापूर्वी काही पोस्टर्स झळकली होती. यात अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱया नेत्यांवर निशाणा साधला गेला. शुभेंदु अधिकारी, हेमंत विश्व शर्मा, नारायण राणे आणि ज्योतिरादित्य सिंधिया समवेत अनेक नेते इतर पक्षांमधून भाजपमध्ये आले होते, त्यानंतर त्यांच्या विरोधातील चौकशी मागे पडल्याचा दावा या पोस्टर्समध्ये करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article