पाच सूतगिरण्यांच्या लिलावास पुन्हा शून्य प्रतिसाद
सांगली :
थकबाकीपोटी ताब्यात असलेल्या आणि खरेदी केलेल्या जिल्ह्यातील पाच स्तगिरण्यांचा जिल्हा बँकेने लिलाव काढला होता. मात्र या लिलावासाठी पुन्हा प्रतिसाद मिळाला नाही. फक्त एका सुतगिरणीसाठी एक निवीदा दाखल झाली. बैंकने ही प्रक्रिया रद्द केली आहे. महिन्याभरात पुन्हा फेरलिबाव काढण्यात येणार आहे. दरम्यान आता या सुतगिरण्याकडील थकीत कर्ज सुमारे १३४.४२ कोटी रुपये मार्च २०२५ पुर्वी वसुल होणे शक्य नसल्याने बँकेसमोरील अडचणी बाढणार आहेत.
जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबधीत असलेल्या पाच सूतगिरण्यांवर जिल्हा बँकेत थकीत कर्ज वसुलीसाठी या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री लिलाव जाहीर केला. संबंधित सूतगिरण्यांकडे तब्बल १३४.४२ कोटी रुपयांची केवळ मुद्दलाची थकबाकी असून त्यावरील कोट्यवधींचे व्याज वेगळे आहे. बँकेने यापूर्वीही या सुतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आताही तेच झाले आहे. निवीदा दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत केवळ एका सुतगिरणीसाठी एकमेव निवीदा दाखल झाली. नियमानुसार तीन निवीदा दाखल झाल्यातरच लिलाव प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे या पाचही सूतगिरण्याचा लिलाव रद्द केला आहे.
महिन्याभरात पुन्हा एकदा फेर लिलाव काढला जाणार आहे. स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका को ऑप स्पिनिंग मिल्स बिटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को ऑप इंडस्ट्रिज इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या पाच सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निवीदा मागवल्या होत्या. सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर २०२४ अखेर केवळ मुद्दलाची १३४ कोटी ४२ लाख ५२ हजार रुपये थकबाकी आहे. यातील तीन सूतगिरण्या बैंकने स्वतः खरेदी केलेल्या आहेत.
- महिन्याभरात फेर निवीदा मागवणारः वाघ
जिल्हा बँकेने पाच सूतगिरण्यांकडील थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी निवीदा मागवल्या होत्या. मात्र पाच पैकी एका सूतगिरणीसाठी एकच निविदा मुदतीत दाखल झाली तर अन्य चारसाठी एकाही निविदा आलेली नाहीत. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या सुतगिरण्यांची अपसेट प्राईज थोडी कमी करून पुन्हा एकदा महिन्याभरात फेर लिलाव काढला जाईल, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
- दिग्गज नेत्यांमुळे खरेदी प्रतिसाद मिळेना येईना ?
जिल्हा बँकने लिलाव पुकारलेल्या पाच सूतगिरण्या सर्व पक्षीय दिग्गज नेत्यांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे यातील दोन संस्थांचे संचालक हे जिल्हा बँकेतही संचालक आहेत. माजीमंत्री जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील व माजी आ. सुमन पाटील, आ. सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर व माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी संबंधित या सूतगिरण्या आहेत. या नेत्यांच्या धाकामुळेच खरेदीदार निवीदा भरत नसल्याची चर्चा सुरू आहे.