For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘झेप्टो’कडून आयपीओसाठी कागदपत्रांचे सादरीकरण

06:06 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘झेप्टो’कडून आयपीओसाठी  कागदपत्रांचे सादरीकरण
Advertisement

मुंबई :

Advertisement

क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने आयपीओसाठी त्यांचा डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) गोपनीय पद्धतीने दाखल केला असल्याची माहिती आहे. एका वृत्तवाहीनीच्या सूत्रांनी या संदर्भात ही माहिती दिली आहे. कंपनी नवीन वर्षात (2026) शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची योजना आखत आहे.

झेप्टोच्या या हालचालीमुळे क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. ब्लिंकिट (इटरनल) आणि इन्स्टामार्ट (स्विगी) सारखे इन्स्टंट किराणा डिलिव्हरी अॅप्स आधीच स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले आहेत.

Advertisement

डीआरएचपी फाइलिंग

गोपनीय मार्गाने डीआरएचपी फाइल करण्याचा फायदा असा आहे की, कंपनी प्रथम सेबी सोबत कागदपत्रे शेअर करते, परंतु जास्त तपशील लोकांसमोर येत नाहीत. यामुळे कंपनीला अभिप्राय मिळतो आणि आवश्यक बदल करण्याची संधी मिळते. झेप्टोने प्री-फायलिंगचे काम पूर्ण केले आहे.

 4,500 कोटी उभारणार

प्राप्त अहवालानुसार, झेप्टोचा आयपीओ सुमारे 500 दशलक्ष डॉलरचा (सुमारे 4500 कोटी) असू शकतो.

Advertisement
Tags :

.