झेंडा चौक ठरला वाय. बी. पाटील चषकाचा मानकरी
गोळीबार स्पोर्ट्स उपविजेता
कै. यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर
येथील पॅव्हेलियन मैदानावर सुरू असलेल्या कै. वाय. बी. पाटील स्मृती चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झेंडा चौक विरुद्ध गोळीबार स्पोर्ट्स यांच्यात झाला. प्रथम फलदांजी करताना गोळीबार स्पोर्ट्सने 8 षटकांत 9 बाद 51 धावा केल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झेंडा चौकने केवळ 4 षटक 5 चेंडूत 52 धावा करून सहज विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.
बक्षीस वितरण समारंभ श्रीराम संस्थेचे चेअरमन संतोष पाटील यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ महादेव नरके, राधेय स्पोर्ट्सचे अध्यक्ष जयदीप जामदार यांच्या उपस्थित पार पडला. विजेत्या संघास रोख 1 लाख 25 हजार रुपये व चषक देण्यात आला. तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये व चषक देण्यात आला. तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघ शरद काशीद स्पोटर्स व दख्खन पन्हाळा या दोन संघांना प्रत्येकी 21 हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
मॅन ऑफ द मॅच वासीक शेख (झेंडा चौक) व मॅन ऑफ द सिरीज ओमी केणी (गोळीबार स्पोटर्स) यांना घोषित करण्यात आले. अंतिम सामन्यात पंच म्हणुन विश्वनाथ लिंगायत व रमेश सोलकर यांनी काम पाहिले. तर स्कोअरचे काम सलीम शेख यांनी केले. यावेळी राजू चव्हाण, मोहन सालपे, सुभाष बुचडे, डॉ राजेंद्र रायकर, संभाजी जाधव, श्रीकांत चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश लोंढे, शामराव करपे, संतोष गायकवाड, ज्योतीकांत पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन राधेय स्पोर्ट्सने केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तानाजी लांडगे, संकेत लांडगे, संजय पवार, सार्थक लांडगे, संजय बोडेकर, शंतनू पाटील आदींनी परिश्रम घेतले.