या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, प्रभास, रामचरणपेक्षा आहे श्रीमंत
झायेद खानची १५०० कोटीहू अधिक निव्वळ संपत्ती
मुंबई
चुरा लिया है तुमने या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता झायेद खान. हा बॉलीवूड किंगखान, प्रभास, रामचरण अल्लू अर्जून यांच्या पेक्षा जास्त नेटवर्थ राखणारा अभिनेता ठरला आहे. झायेद हा निर्माता संजय खान यांचा मुलगा आणि फिरोज खान यांचा पुतण्या आहे.
मै हूं ना या चित्रपटातून किंगखान शाहरूख खान सोबत रुपेरी पडद्यावर झळकलेला झायेद याची अभिनयाची कारकिर्द या सिनेमानंतर थोडी मंदाविली होती. अशातच त्याने खचून न जाता व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. त्याला या व्यवसायातून
त्याची अभिनय कारकीर्द मंदावली असताना, झायेद खानने व्यवसायात मात्र उल्लेखनीय बदल केला. ET now नुसार आज त्याची १५०० कोटींहून अधिक निव्वळ संपत्ती आहे. झायेद ने अभिनय क्षेत्रातून त्याचे लक्ष व्यवसायात केंद्रीत केले. त्याच्या व्यवसाय व्यवस्थापन पदवीचा वापर करून, त्याने स्टार्टअप्स आणि उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली. यानंतर त्याच्या निव्वळ संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली. २०२४ पर्यंत, ET Now ने १५०० कोटी रुपयांचा अंदाज लावला.
याप्रसंगी एक मुलाखतीत झायेदला आर्थिक सल्लाही विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, "तुमच्या क्षमतेनुसार जगा. एक म्हण आहे तुम्हाला फेरारी परवडत असेल तर मर्सिडीज घ्या. आणि जर तुम्हाला मर्सिडीज परवडत असेल तर फियाट घ्या.'"
झायेद खानने २००३ मध्ये चुरा लिया है तुमने या चित्रपटाद्वारे बॉलीवूड कारकिर्दीची सुरुवात केली. जरी त्याच्या पदार्पणात खास प्रसिद्धी यश मिळालं नसलं, तरी त्याने शाहरुख खान सोबत अभिनय करून मैं हूं ना (२००४) मधून प्रसिद्धी मिळवली. लकी या त्याच्या भूमिकेने त्याला लोकप्रिय केले.
त्याने दस (२००५), शादी नंबर १ (२००५), आणि ब्लू (२००९) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचे नंतरचे चित्रपट फार काही चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. अखेर त्याने स्पॉटलाइटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये, झायेदने हासिल या टेलिव्हिजन शोद्वारे पुनरागमनही केले होते.
झायेदने त्याची बालपणीची मैत्रिण मलायका पारेखशी २००५ लग्न केले. मलायका ही ज्वेलरी डिझायनर आहे आणि तिने त्याच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात नेहमीच झायेदला पाठिंबा दिला आहे. या जोडप्याला जिदान आणि आरीझ ही दोन मुले आहेत.
त्याला त्याच्या नेटवर्थ बद्दल विचारणा केली असता, झायेदने या आकडेवारीला होकार किंवा नकार न देता हसून हसून सांगितले. जर खरे असेल, तर ते रणबीर कपूर (रु. ५५० कोटी), प्रभास (४०० कोटी), अल्लू अर्जुन (३५० कोटी) आणि अगदी राम चरण (१,३०० कोटी) यांसारख्या स्टार्सच्याही पुढे आहे.