कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जरीन खान अन् शिवाशिषचा ब्रेकअप

06:28 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानचा ब्रेकअप झाला आहे. जरीन ही दीर्घकाळापासून बिग बॉस 12 फेम शिवाशिष मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला आहे. दोघेही परस्पर सहमतीने वेगळे झाले आहेत अशी माहिती जरीनच्या एका मित्राने दिली आहे.

Advertisement

Advertisement

जरीन आणि शिवाशिषने सोशल मीडियावर परस्परांना अनफॉलो केले आहे. तर दोघांनीही या ब्रेकअपविषयी बोलणे टाळले आहे. जरीन आणि शिवाशिषने 2021 मध्ये परस्परांना डेट करण्यास सुरुवात केली होती. आम्ही परस्परांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला परस्परांची साथ आवडते. हे नाते कुठपर्यंत जाते हे पहावे लागणार आहे. सध्या आम्ही कुठल्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची घाई करणार नाही. आम्ही परस्परांना पसंत करतो हेच आमच्यासाठी पुरेसे आहे असे जरीनने 2021 मध्ये बोलताना म्हटले होते.

जरीनने अलिकडेच आपण विवाह करणार नसल्याचे सांगितले होते. सध्या ज्या गोष्टी पहायला मिळतात, ते पाहता विवाह करण्याची माझी इच्छा नाही. ज्याप्रकारे माणूस स्वाइप करून खाण्याची ऑर्डर देत आहे, त्याचप्रकारे माणसांनाही स्वाइप करत आहेत. जग अत्यंत विचित्र होत चालल्याचे जरीनने म्हटले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article