For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झरीन, अरुंधती चौधरी उपांत्य फेरीत

06:10 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
झरीन  अरुंधती चौधरी उपांत्य फेरीत
Advertisement

साक्षी पराभूत पराभूत, दीपक, नवीन कुमारची आगेकूच

Advertisement

वृत्तसंस्था/ सोफिया, बल्गेरिया

दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन व अरुंधती चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या 75 व्या स्टँडजा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

निखत झरीनने 50 किलो वजन गटाच्या लढतीत फ्रान्सच्या एल्खादिरी वासिलावर 5-0 अशी मात केली. गुणावरून सामना एकतर्फी झाल्याचे वाटत असले तरी ही लढत अतिशय चुरशीची झाली. दोघींनी तोडीस तोड खेळाचे प्रदर्शन घडविले, पण अखेर झरीनने बाजी मारण्यात यश मिळविले. झरीनने जलद हालचाली आणि प्रतिआक्रमणात गुण मिळवित प्रतिस्पर्धीला मागे टाकत पहिला राऊंड 3-2 असा जिंकला. दुसऱ्या राऊंडमध्येही झरीनने वर्चस्व राखत 3-2 असे वर्चस्व राखले तर तिसऱ्या राऊंडमध्ये एल्खादिरीचे आक्रमक फटके चुकवण्यात यश मिळविताना काही जोरदार फटकेही लगावले. तिची पुढील लढत स्थानिक खेळाडू झ्लाटिस्लाव्हा चुकानोव्हाशी होईल.

अन्य एका सामन्यात 66 किलो वजन गटात अरुंधती चौधरीने सर्बियाच्या मॅटोविच मिलेनावर पूर्ण वर्चस्व राखत 5-0 असा विजय मिळविला. दोघींनी प्रारंभी सावध खेळ केल्यानंतर अरुंधतीने नियंत्रण मिळविले आणि आक्रमक फटकेबाजी करीत पहिला राऊंड जिंकला. हाच जोम तिने दुसऱ्या राऊंडमध्येही कायम ठेवला तर तिसऱ्या राऊंडमध्ये तिने भक्कम बचाव करीत ही लढत जिंकली. तिची उपांत्य लढत स्लोव्हाकियाच्या जेसिका ट्राएबेलोव्हाशी होईल.

अन्य लढतीत साक्षीला 57 किलो गटाच्या लढतीत उझ्बेकच्या मामाजोनोव्हा खुमोराबोनूकडून उपांत्यपूर्व फेरीत 2-3 असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी दीपक (75 किलो गट), नवीन कुमार (92 किलो गट) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर 5-0 याच फरकाने मात करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. किर्गीझस्तान व लिथुआनियाच्या खेळाडूंवर त्यांनी विजय मिळविले.

Advertisement
Tags :

.