For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘झेड’ सुरक्षा

06:30 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘झेड’ सुरक्षा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना केंद्र सरकारने ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना असणारा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राजीव कुमार यांना 40 ते 50 प्रशिक्षित कमांडोंचे संरक्षण देण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय गृहविभागाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला मंगळवारी केली आहे.

राजीव कुमार यांना धोका होऊ शकतो, असा अहवाल केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी नुकताच केंद्र सरकारला दिला होता. त्यावर विचार करुन हा निर्णय घेण्यात आला. राजीव कुमार यांना देशभरात दौरे करावे लागतात. या दौऱ्यांच्या वेळी होणारा संभाव्य धोका केंद्र सरकारने लक्षात घेतला आहे. आता कुमार जेथे जातील तेथे सातत्याने त्यांच्यासमवेत प्रशिक्षित सशस्त्र कमांडो असतील. त्यांना चोवीस तास संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.