युजवेंद्र चहल प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त
वृत्तसंस्था, लंडन
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपला शेवटचा सामना इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील गेल्या महिन्यात लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला होता. तो या स्पर्धेत नॉर्दम्पटनशायर क्लबकडून खेळत होता.
भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने आपल्या वैयक्तीक क्रिकेट कारकिर्दीत 72 वनडे आणि 80 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच त्याने 49 प्रथम श्रेणी सामन्यात 148 गडी बाद केले असून त्याने सहा वेळा पाचपेक्षा अधिक बळी मिळविले आहेत. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील चहलचा हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचा हंगाम असून त्याने नॉर्दम्पटनशायर क्लबकडून या हंगामात पाच सामन्यात 21 गडी बाद केले. तसेच त्याने ड्युरहॅम संघाविरुद्ध खेळताना 9 बळी घेतले आहेत. मात्र त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी शेवटपर्यंत मिळू शकली नाही. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात खेळविण्यात आलेल्या चार दिवसांच्या सामन्यात चहलला तत्कालिन प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने संधी दिली होती.