वारणा कृषी २०२४ प्रदर्शनात 'युवराज' रेड्याचे विशेष आकर्षण
कोल्हापूरः
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तात्यासाहेब कोरे, वारणा विभाग शेती पूरक आणि शेती प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून वारणानगरात १५ वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
वारणा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, 'शेतीपूरक'चे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक व अधिकारी आदींची प्रमुख होती. या प्रदर्शनाला केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालयाने साहाय्य केले आहे.
या कृषी प्रदर्शनात गडहिंग्लज तालुक्यातील हसूरचंपू या गावातील १ हजार ३६० किलो वजनाचा मुरा जातीचा रेडा, वर्षाला ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी, सहा किलो वजनाचा कोंबडा लक्षवेधी यांचे विशेष आकर्षण आहे. प्रदर्शनात कृषी उपयोगी साहित्य, बी बियाणे, तसंच कृषी उपकरणांचे विविध स्टॉल उपलब्ध आहेत.
प्रदर्नात अमेरिकन बेंटम जातीचे साडेतीन वर्षाचं केसाळ १८ इंच बोकड, तिस किलोचा चायना झिंग जातीचा बोकड, सिरीयन हैमस्टर जातीचे उंदीर, साडेपाच लाख रुपये किंमतीचा औषध फवारणीचा ड्रोन आहे. वारणा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकविलेला विविध जातींचा ऊस, विविध जातीचे पक्षी, परदेशी भाजीपाला, फळांचे स्टॉल ही मांडण्यात आलेत. कृषिविषयक शासकीय योजनांसह आरोग्य विषयक माहितीही या प्रदर्शनातून दिली जातं आहे.
प्रदर्शनात शेती, औद्योगिक, गृहपयोगी, खाद्यसंस्कृती असे १५० हून अधिक स्टॉल आहेत. प्रदर्शनात कवठेमहंकाळ येथील राकेश कोळेकर यांचा 'चायना झिंग' जातीच्या व सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या बोकड आणि बारामती येथील यशराज घाटगे यांच्या १२ महिने वयांच्या सहा किलोंच्या 'राजा' कोंबड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसह अबालवृद्धांनी गर्दी केली. प्रदर्शनात जनावरं आणि पक्षांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे.