युवा संदेश प्रतिष्ठानच्या एसटीएस परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्या हस्ते प्रकटन
कणकवली / प्रतिनिधी
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधू रत्न टॅलेंट सर्च एसटीएस परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. सिंधूरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ही यादी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जि. प बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्या हस्ते लॅपटॉपवर बटण दाबून जाहीर करण्यात आली. यावेळी जि .प .माजी अध्यक्ष संदेश सावंत, सौ. संजना सावंत, एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज, प्रशांत बोभाटे, यांच्यासह शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयाची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता 4 थी, 6 वी, 7 वी मधील पहिल्या 5 गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सफर घडविण्यात येणार आहे.2 री व 3 री मधील पहिल्या 5 गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर ला भेटी साठी नेण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून 30 विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सफर व 20 विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर भेट घडविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रत्येक इयत्तेतील 50 अशा 250 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, मेडल व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
विमानाने ईस्त्रो सफारी साठी निवड झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता ७ वी
राऊळ वेदा प्रवीण (सावंतवाडी), राणे पूर्वा गजानन (हिंदळे), पिकुळकर रुद्र रामचंद्र (सांगेली), बर्डे प्रारब्ध पृथ्वीराज (कुडाळ), बावकर अवनी रामनाथ (सावंतवाडी)
इयत्ता ६ वी
भिसे अर्णव राजाराम (फोंडाघाट), प्रभू दूर्वा रवींद्र (कुडाळ), घाडी वीरा राजीव (सावंतवाडी), सान्वी विष्णू कुबल (आचरा),
झेंडे स्वरदा अरविंद (वजराट)
इयत्ता 4 थी
वरुटे शर्विल आनंदा (नेरुर), पाटील ज्ञानदा नितीन (तळेरे), खरात आराध्य बापू (शिरगाव ), गावकर श्रेयन दयानंद (दिगवळे), घोरपडे अखिलेश विजय (कणकवली)