For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपल्यामुळे युरी आलेमावना वाटतेय असुरक्षित : विजय

01:21 PM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आपल्यामुळे युरी आलेमावना वाटतेय असुरक्षित   विजय
Advertisement

युतीसाठी कुणाचीही वाट पाहणार नाही, दहा मतदारसंघांत उतरविणार उमेदवार

Advertisement

मडगाव : आपण आता कोणाचीही युतीसाठी वाट पाहणार नाही. प्रादेशिक पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे हे कर्तव्य असून दहा मतदारसंघांत म्हणजे 25 टक्के मतदारसंघांत उमेदवार उतरविण्याचा विचार आपल्या पक्षाने चालविला आहे,  गुढीपाडव्यापासून नववर्ष प्रारंभ झाला आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. आजपासून आपण फातोर्डातील घराघरात जाऊन प्रचार करणार आहे. तसेच उर्वरित ज्या मतदारसंघांत विजय मिळविण्यासाठी आपला पक्ष उमेदवार उतरविणार आहे तेथील गट समित्या एप्रिलपर्यंत जाहीर केल्या जाणार आहेत.

मग फोंड्यात उमेदवार का?

Advertisement

लोक एकजुटीचा पुरस्कार करत होते त्यांनीच आता फोंड्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, जरी आपली काँग्रेससोबत युती असली, तरी त्या पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला ‘ज्युडास’ आणि ‘फिक्सर’ असे संबोधले आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्यानंतर ते आपल्यासोबत प्रचार करण्याची अपेक्षा कशी करू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्यामुळे विरोधकांना, विशेष करून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना राजकीयदृष्ट्या असुरक्षित वाटत आहे, असे सरदेसाई म्हणाले. त्यांनी काँग्रेसला सल्ला दिला की, त्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, जेणेकरून काही लोकांना तरी अखेर शांतता लाभेल. त्याचवेळी, त्यांनी अशी पुस्तीही जोडली की, केवळ मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केल्याने गोष्टी काही आपोआप सोप्या होणार नाहीत.

Advertisement
Tags :

.