For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युमनाम खेमचंद सिंह होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री

06:22 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
युमनाम खेमचंद सिंह होणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री
Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक : स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी ओळख

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

ईशान्येतील राज्य मणिपूरमध्ये 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार आहे. यापूर्वी रालोआमध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यावरून हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान भाजप विधिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी युमनाम खेमचंद यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूर भाजपच्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. वर्तमान काळात मणिपूरची राजधानी इंफाळच्या सिंगजामेई मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 2012 पासून ते या मतदारसंघात विजयी होत राहिले आहेत. परंतु त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात तृणमूल काँग्रेसमधून झाली होती. 2012 मध्ये ते याच पक्षाच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर युमनाम हे भाजपमध्ये सामील झाले आणि 2017 तसेच 2022 मध्ये भाजपच्या तिकीटावर विजय झाले होते.

2017 मध्ये भाजपने त्यांना मणिपूर विधानसभा अध्यक्षपदाची संधी दिली होती. ते राज्यात भाजपचे सरकार वाचविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते ठरले होते. युमनाम हे पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे नेते ठरले होते.  2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नावही चर्चेत होते. परंतु एन. बिरेन सिंह हे मुख्यमंत्रिपद मिळविण्यास यशस्वी ठरली होती. बिरेन सिंह सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते.

युमनाम यांची प्रतिमा स्वच्छ असून ते राज्याच्या लोकांदरम्यान स्वत:च्या निष्पक्ष कार्यशैलीसाठी ओळखले जातात. युमनाम हे आता मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री होणार आहेत. युमनाम सिंह हे राज्यातील प्रभावशाली मैतेई समुदायाशी संबंधित आहेत.

Advertisement
Tags :

.