For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युलिया स्विरिडेन्को युक्रेनच्या पंतप्रधान

03:57 PM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
युलिया स्विरिडेन्को युक्रेनच्या पंतप्रधान
Advertisement

कीव : युलिया स्विरिडेन्को आता युक्रेनच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. युक्रेनियन संसदेने त्यांना पंतप्रधान म्हणून निवडले. युलिया यापूर्वी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या. त्या 39 वर्षांच्या असून व्यवसायाने अर्थतज्ञ आहेत. त्यांनी 2020 पासून पंतप्रधान असलेल्या डेनिस श्मिहाल यांची जागा घेतली आहे. उपपंतप्रधान असताना स्विरिडेन्को यांनी यावर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत खनिज करार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांचे खूप कौतुक झाले. नवीन मंत्रिमंडळातही काही इतर बदल केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.