युकी भांब्री दुहेरीच्या अंतिम फेरीत
06:34 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, जिनिव्हा
Advertisement
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्रीने आपला साथिदार मिचेल व्हिनस समवेत दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
2026 च्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील स्पर्धेत भांब्रीने पहिल्यांदा दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युकी भांब्री आणि त्याचा न्यूझीलंडचा साथिदार मिचेल व्हिनस यांनी झेकच्या रिकी व अॅडॅम पॅव्हेलासेक यांचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत रोमानियाच्या अॅमेडो आणि मार्क पोलमन्स यांनी फ्रेनझेन आणि रॉबिन हॅस यांचा 7-6 (7-4), 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
Advertisement
Advertisement