महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंध्रप्रदेशात वायएसआर नेत्याची तेदेप नेत्याकडून निर्घृण हत्या

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /विनुकोंडा

Advertisement

आंध्रप्रदेशात बुधवारी रात्री वायएसआर काँग्रेसच्या नेत्याचे दोन्ही हात कापून भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. ही हत्या राज्यातील सत्तारुढ तेदेपच्या स्थानिक नेत्याने केली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी युवकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते, जेथे त्याचा मृत्यू झाला आहे. पालनाडु जिल्ह्यातील विनुकोंडामध्ये बुधवारी रात्री वायएसआर काँग्रेसच्या युवा शाखेचे सदस्य शेख रशीदवर एका युवकाने धारदार अस्त्राने हल्ला केला होता. आरोपीचे नाव शेख जिलानी असून तो तेदेपचा स्थानिक नेता आहे. या हत्येमागे कुठलेही राजकीय कारण नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. गांभीर्य पाहता विनुकोंडामध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कांची श्रीनिवास राव यांनी सांगितले.हत्येचा व्हिडिओ समोर आला असून यात जिलानी धारदार अस्त्राने रशीदवर हल्ला करताना दिसून येतो.

Advertisement

सत्ता कायमस्वरुपी नसते..

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वायएस जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांचे सरकार दडपशाही करत असल्याचे म्हटले आहे. नायडू यांनी सत्ता कायमस्वरुपी नसते याची आठवण करून देऊ इच्छितो. राज्यातील बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article