आंध्रप्रदेश काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी वाय एस शर्मिला यांची नियुक्ती
काँग्रेसने आज आंध्र प्रदेशामध्ये नविन खेळी करत वाय.एस. शर्मिला यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या (APCC) अध्यक्षपदी निवड केली आहे. शर्मिला ह्या माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहे.
यासंदर्भात माहीती देताना काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, "काँग्रेस अध्यक्षांनी वायएस शर्मिला रेड्डी यांची आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची ही निवड केंद्रिय नेर्तृत्वाने तात्काळ प्रभावाने केली आहे," असे म्हटले आहे.
या वर्षीच्या सुरवातीलाच म्हणजे 4 जानेवारीला वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यापुर्वीचे अध्यक्ष गिदुगु रुद्र राजू हे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर दिवसानंतर तिची नियुक्ती झाली.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात लिहिताना काँग्रेसच्या पक्षाने “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी माजी अध्यक्ष गिदुगु रुद्र राजू, यांना काँग्रेस कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य़ म्हणून नियुक्त केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षीय समितीचे सदस्य म्हणून गिदुगु रुद्र राजू यांनी दिलेल्या योगदानाची पक्षाने नेहमीच कौतुक केले आहे.,” असे म्हटले आहे.
8 जुलै 2021 रोजी वाय. एस. शर्मिला यांनी स्वता अध्यक्ष असताना आपला पक्ष YSR तेलंगणा या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीन केला होता. काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना शर्मिला यांनी काँग्रेस हा देशातील सर्वात धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे.
या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना वाय. एस. शर्मिला यांनी “माझ्याकडून जमेल त्या क्षमतेने मी पक्षासाठी पूर्ण समर्पण आणि वचनबद्धतेने काम करेन. राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान म्हणून पाहण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न होते आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन." असेही त्या म्हणाल्या.