युट्यूबर मिस्टर बीस्ट 27 व्या वर्षी अब्जाधीश
दरमहा 427 कोटींची कमाई : मरण्यापूर्वी संपूर्ण संपत्ती दान करण्याची इच्छा
वृत्तसंस्था/ मुंबई
मिस्टर बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले युट्युबर जिमी डोनाल्डसन अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. 27 व्या वर्षी त्यांची संपत्ती 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8,500 कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, तो जगातील 8 वा सर्वात तरुण अब्जाधीश बनला आहे. मिस्टर बीस्टची मासिक कमाई सुमारे 50 दशलक्ष डॉलर म्हणजे (427 कोटी रुपये) आहे. मिस्टर बीस्ट मरण्यापूर्वी सर्व पैसे दान करणार असल्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
2019 मध्ये, मिस्टर बीस्टने ट्विट केले, माझे ध्येय पैसे कमवणे आहे, परंतु मी मरण्यापूर्वी प्रत्येक पैसा दान करेन. यानंतर 2023 मध्ये, तो म्हणाला की श्रीमंतांनी इतरांना मदत करावी. मी हेच करेन. माझे प्रत्येक पैसे दान केले जातील. ते म्हणाले होते की, ‘मी कागदावर अब्जाधीश आहे, पण माझ्या बँक खात्यात 10 दशलक्ष डॉलर्स (8.3 कोटी रुपये) नाहीत.’ मी महिन्याला जितका खर्च करतो तितकाच पगार देतो.
मिस्टर बीस्ट हे युट्यूबवरील सर्वात मोठे क्रिएटर
मिस्टर बीस्ट हे युट्यूबवरील सर्वात मोठ्या क्रिएटरपैकी एक आहेत. युट्यूबवर त्यांचे 396 दशलक्ष सबक्राइबर आहेत. याशिवाय, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि इंस्टाग्रामवर त्यांचे 500 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्याकडे फीस्टेबल्स (चॉकलेट ब्रेड) आणि मिस्टर बीस्ट बर्गर सारख्या कंपन्या देखील आहेत, ज्या अमेरिकेत खूप लोकप्रिय आहेत.
युट्यूब चॅनेल 13 व्या वर्षी सुरु
मिस्टर बीस्टने वयाच्या 13 व्या वर्षी ‘मिस्टर बीस्ट6000’ नावाचे युट्यूब चॅनेल सुरू केले. सुरुवातीच्या काळात, तो गेमिंग आणि इतर युट्यूबर्सच्या कमाईचा अंदाज लावण्यासारखे व्हिडिओ बनवत असे, परंतु 2017 मध्ये, 1 लाखांपर्यंत मोजणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे नशीब बदलले.