For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यूट्यूबर एल्विश यादवला 14 दिवसांची कोठडी; रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी सर्पविष वापरल्याचा आरोप

06:44 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
यूट्यूबर एल्विश यादवला 14 दिवसांची कोठडी  रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी सर्पविष वापरल्याचा आरोप
Advertisement

नोएडामधून अटक : 

Advertisement

वृत्तसंस्था/ नोएडा

नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या यूट्यूबर एल्विश यादवला स्थानिक पोलिसांनी रविवारी चौकशीनंतर अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास ‘एनडीपीएस एक्ट’ म्हणजेच ‘नार्कोटिक्स ड्रग्ज अँड साइकोट्रोपिक सब्सटेंस’ कायद्यानुसार त्याला किमान 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Advertisement

रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादव याच्यावर एफआयआर दाखल केला आहे. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेला विषाचा नमुना कोब्राचा असल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल यादव नावाच्या एका आरोपीसह पाच जणांना यापूर्वी अटक केली आहे. मात्र, एल्विश यादवने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या प्रकरणात गुंतलेल्या एल्विशने गेल्या फेब्रुवारीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ करत एका संस्थेवर आपल्याला बनावट प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला होता. रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर एल्विशने 13 मिनिटे 34 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला असून नोएडामधील रेव्ह पार्टीच्या वेळी आपण मुंबईत असल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, एल्विश यादव यांनी केलेल्या आरोपांवर पोलीस उपायुक्त विद्या सागर मिश्रा यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांकडून पुरावे गोळा केले जात असून, त्याआधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.