पंजाबमधील युट्यूबरला हेरगिरीप्रकरणी अटक
ज्योति मल्होत्राशी कनेक्शन : तीनवेळा पाकिस्तानचा प्रवास
मोहाली : पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एका पाकिस्तानी हेराला ताब्यात घेतले आहे. आरोपी एक युट्युबर असल्याचे समोर आले आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने मोहालीच्या रुपनगर येथील महालन गावाचा रहिवासी जसवीर सिंहला अटक केल्याची माहिती दिली आहे. जसवीर सिंह युट्युबवर ‘जान महल’ नावाने एक चॅनेल चालवितो. त्याचे कनेक्शन पीआयओ शाकिर उर्फ जट्ट रंधावासोबत निघाले आहे. आरोपी दहशतवाद समर्थित हेरजाळ्याचा हिस्सा आहे. जसवीरने हरियाणात हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आलेली युट्युबर ज्योति मल्होत्रा आणि पाकिस्तानी अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशसोबत देखील संपर्क ठेवला होता.
ज्योति मल्होत्राच्या संपर्कात
ज्योति मल्होत्राच्या चौकशीत आरोपी जसवीरचे नाव समोर आले होते. हा आरोपी ज्योति मल्होत्राशी संबंधित होता. दोघांमध्ये अनेकदा संभाषणही झाले होते. ज्योति मल्होत्राद्वारेच जसवीर पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्याच्या संपर्कात आला होता.