मराठा आरक्षणासाठी तरुणांनी दुंडगे येथे काढली दुचाकी रॅली
कोवाड प्रतिनिधी
दुंडगे (ता.चंदगड) येथील मराठा तरुणांनी मराठा आरक्षण दुर्लक्षित होवू नये म्हणुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुचाकी रॅली काढली.
भगवा झेंडा, भगवी टोपी परिधान करून ५० दुचाकी वरून संपुर्ण कर्यात भाग फिरून काढला.
प्रारंभी दुंडगे येथून रॅली ला सुरवात झाली. त्यांनतर राजगोळी बुद्रुक,राजगोळी खुर्द, तळगोळी, कुदणुर, कालकुंद्री, कागणी, किणी मार्गे दुपारी कोवाड येथे पोहचली. यावेळी सरपंच सौ अनिता भोगण, साहित्यीक पांडूरंग जाधव, रामचंद्र व्हन्याळकर, श्रीकांत पाटील यांनी रॅली चे स्वागत केले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाहीं कुणाच्या बापाचे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दुंडगे गावचे माजी सरपंच राजू पाटील यांचा पुढाकाराने काढलेल्या या रॅलीत गजानन राजगोळकर, गुंडू बामणे, मारुती पाटील, बाळा पाटील, तुकाराम पाटील,विक्रम कोकीतकर भरत पाटील गणपती पाटील रुपेश पाटील आयुष पाटील हर्षद पाटील संगम पाटील आदी तरुण सामील झाले होते.