तरुणांनी मोठ्या संख्येने एनसीसीमध्ये सहभागी व्हावे
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे आवाहन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 24 नोव्हेंबर रोजी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या 116 व्या भागात देशाला संबोधित केले. आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी मी महिनाभर मन की बातची वाट पाहत असतो, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच आज ‘एनसीसी दिवस’ असल्याची आठवण करून देत देशभरातील तरुण आणि युवा वर्गाने एनसीसीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सीमेवरील राज्यांमध्ये अधिकाधिक तरुणांना ‘एनसीसी’शी जोडण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे. मी तरुणांना जास्तीत जास्त संख्येने एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करेन. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर करत असताना व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ‘एनसीसी’ची खूप मदत होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
‘एनसीसी’चे नाव येताच आपल्याला शाळा-कॉलेजचे दिवस आठवतात, मी स्वत: ‘एनसीसी’ पॅडेट असल्यामुळे यातून मिळालेला अनुभव माझ्यासाठी अमूल्य असल्याचे पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले. ‘एनसीसी’ तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना निर्माण करते. पूर असो, भूकंप असो किंवा कोणतीही अन्य नैसर्गिक आपत्ती असो, एनसीसी पॅडेट्स मदतीला नक्कीच हजर असतात, असेही ते पुढे म्हणाले.
दहा वर्षात पॅडेट्सच्या संख्येत वाढ
आज देशात ‘एनसीसी’ मजबूत करण्यासाठी सतत काम केले जात आहे. 2014 मध्ये सुमारे 14 लाख तऊण ‘एनसीसी’शी जोडले गेले होते. मात्र, आता 2024 मध्ये 20 लाखांहून अधिक तऊण ‘एनसीसी’शी जोडले गेले आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता 5 हजार नवीन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘एनसीसी’ची सुविधा आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पूर्वी ‘एनसीसी’मध्ये महिला कॅडेट्सची संख्या फक्त 25 टक्के होती, आता हा आकडा 40 टक्क्मयांच्या आसपास पोहोचला आहे, असे मोदी म्हणाले.
‘भारत मंडपम’मध्ये युवा विचारांचा महाकुंभ
विकसित भारत घडवण्यात तऊणांची भूमिका खूप मोठी आहे. जेव्हा तऊण मन एकत्र येऊन विचारमंथन करतात आणि देशाच्या भविष्यातील प्रवासाचा विचार करतात, तेव्हा त्यातून निश्चितच ठोस मार्ग निघतात. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीनिमित्त देशभरात युवा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने 11-12 जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे युवा विचारांचा महाकुंभ होणार आहे. या महाकुंभाचा लाभ युवा वर्गाने घ्यावा, असेही पंतप्रधान म्हणाले.