For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवांचे रिटायरमेंट हाउस

06:14 AM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
युवांचे रिटायरमेंट हाउस
Advertisement

दूरदूरवरून आराम करण्यासाठी येत आहेत युवा

Advertisement

तुम्ही आतापर्यंत वृद्धांसाठी निर्माण करण्यात आलेल्या केयर होम्सविषयी ऐकले असेल. या ठिकाणी वृद्ध निवृत्तीनंतर आराम करत असतात. येथे त्यांना केवळ आराम करायचा असतो. परंतु आता या संकल्पनेसारखे यूथ रिटायरमेंट होम सुरू झाले आहे. येथे युवा आरात करतात. तसेही युवा स्वत:च्या जीवनातील तणावामुळे त्रस्त आहेत. विशेष म्हणजे या होमध्ये युवांची मोठी गर्दी होत आहे.

या रिटायरमेंट होमचा मालक स्वत:चा 25 वर्षांचा युवा आहे. त्याचे पालक वृद्धांसाठी केयर होम चालवतात, स्वत:च्या पालकांकडून वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेले रिटायरमेंट होम पाहून त्याला युवांसाठी असेच काही तरी करण्याची कल्पना सूचली. यानंतर त्याने यूथ रिटायरमेंट होम निर्माण पेले आहे. येथे येणारे लोक स्वत:च्या मर्जीनुसार हवा तितका वेळ झोपू शकतात, कुणीच डिस्टर्ब करणारा नसतो.

Advertisement

का भासली गरज

सद्यकाळात वयाच्या तिशी अन् चाळीशीत असलेले लोक पूर्वीच तणावाला सामोरे जात आहेत. त्यांना रिलॅक्स करण्याची संधी कुठेच मिळत नाही. घर, ऑफिसच्या जबाबदारीने त्यांना वृद्धत्वापूर्वीच थकविले आहे. अशास्थितीत हे होम त्यांच्यासाठी स्वप्नवत आहे. येथे येऊन अनेक युवा महिनाभर राहु शकतात, याच्या बदल्यात त्यांना केवळ 44 हजार रुपये खर्च करावे लागतात, यात त्यांचे वास्तव्य, तीनवेळचे भोजन आणि आरामदायी वातावरण सामील असल्याचे या होमच्या मालकाने सांगितले आहे. युवांच्या स्वप्नातील हे होम मलेशियाच्या क्वालांलपूर येथे आहे. 8 एकरात खुल्या झालेल्या या होममध्ये राहताना लोकांना काहीच करण्याची गरज भासत नाही.

जेन जीला आवडली कल्पना

यूथ रिटायरमेंट होमची ही कल्पना युवांना पसंत पडत आहे. येथे 9-5 च्या जॉबचे टेन्शन नाही. येथे घरात तयार केलेले जेवण मिळते, तसेच इच्छा असल्यास बागकाम करता येते किंवा केवळ पडून राहता येते. चीनमध्ये आता युवा अशा संकल्पनेला मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. यशासाठी व्याकुळ युवा आता थकले आहेत. आता त्यांची केवळ आणि केवळ आराम करण्याची इच्छा आहे. अशास्थितीत अशाप्रकारचे रिटायरमेंट होम युवांना एक आशा देत आहे. जानेवारीचे बुकिंग पूर्ण झाले असून आता फेब्रुवारीसाठी बुकिंग सुरु असल्याचे याच्या संस्थापकाने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.