कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समाजहितासाठी राबतात राजारामपुरीतील युवक

11:24 AM Aug 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

 युवक मित्र मंडळाची अखंड जनसेवेची 43 वर्षे

Advertisement

कोल्हापूर / दिव्या कांबळे :

Advertisement

1982 पासून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजारामपुरीतील युवक मित्र मंडळाने नेहमीच सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. मंडळाकडून आजवर झाडे लावा-झाडे जगवा, रक्तदान शिबिरे, नेत्रदान प्रकल्प, स्वच्छ सुंदर कोल्हापूर, वीज वाचवा-पाणी वाचवा यांसारख्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

मंडळाने 2009 मध्ये सुरु केलेला स्वच्छ सुंदर कोल्हापूर हा उपक्रम आजही अखंडित सुरू आहे. मंडळाद्वारे घरगुती कचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. वीज वाचवा, पाणी वाचवा या मोहिमेंतर्गत 2016 साली सुमारे 40 हजार घरांमध्ये युनिट प्रकल्पाचे मोफत वाटप करण्यात आले होते.

आरोग्याच्या दृष्टीने तरुणांसाठी व्यायामशाळा, कमवा आणि शिका योजना, महिलांसाठी संगणक प्रशिक्षणवर्ग आणि पाककला प्रशिक्षण दिले जाते. कोरोना काळात मंडळाचे अध्यक्ष बाबा इंदुलकर कांदा-बटाटा विक्रीत सहभागी झाले होते. जनसेवा हीच ईश्वरसेवा ही भावना मंडळाने दाखवून दिली होती. मंडळ आजही पर्यावरणपूरक शाडू मूर्ती बसवतात आणि ती दान करतात.

1972 मध्ये स्थापन झालेल्या राजारामपुरीतील युवक मित्र मंडळाने आजवर सामाजिक जाणीवेचे विविध उपक्रम राबवून शहरात आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेली ही वाटचाल, केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता समाजहिताच्या अनेक क्षेत्रांत प्रभावी पावले टाकत आहे.

विद्यार्थीदशेत असल्याने सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाचे स्वरुप साधे होते. 1982 पासून सामाजिक बांधिलकी जपत विधायक उपक्रमांची सुरुवात झाली. स्वच्छ सुंदर कोल्हापूर हा उपक्रम 2009 पासून आजही सुरु आहे. घराघरातील कचरा एकत्र करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. वीज वाचवा, पाणी वाचवा या मोहिमेंतर्गत 2016 साली सुमारे 40 हजार घरांमध्ये युनिट मोफत वाटप करण्यात आलेत.

समाजासाठी काही करायचे असेल, तर विधायक काम हाती घ्या. गरज पडली तर पाच मंडळांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. राजारामपुरीतील युवक मित्र मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेले कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे ठरत आहे. याच प्रेरणेतून इतरांनीही सामाजिक कार्यात पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मंडळाने राबवलेल्या अनेक उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी मंडळाला प्रमाणपत्र दिले आहे. नेत्रदान अभियानाला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जंगली भागांतील लोकांच्या उपयोगासाठी मंडळाने ‘युवक सांज दीप’ हा प्रकाश उपक्रम सुरू केला.

आताच्या पिढीला डिजेपासून लांब नेणे महत्वाचे आहे. समाजासाठी उपयोगी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. मिरवणूक हे तात्पुरते सेलिब्रेशन आहे. मंडळाचे काम पुढे घेऊन जायचे असेल, तर एकत्र येऊन विधायक कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच मंडळानी एकत्र येऊन काम केले तरी चालेल. सगळे मिळून अॅम्ब्युलन्स खरेदी केल्यास ती समाजासाठी उपयोगी पडू शकते. ब्लड बँक काढता येते. अशा पद्धतीने काम केल्यास ते समाजासाठी उपयोगी पडू शकते.
                                                                                                     - किशोर मळेकर, युवक मित्र मंडळ कार्यकर्ते

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article