For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवानेते विशाल परब यांच्या हस्ते आदिनारायण दिनदर्शिकेचे प्रकाशन

12:21 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
युवानेते विशाल परब यांच्या हस्ते आदिनारायण दिनदर्शिकेचे प्रकाशन
Advertisement

परुळे/प्रतिनिधी

Advertisement

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते कोकण दिप प्रकाशन परूळेच्या आदिनारायण दिनदर्शिका २०२६चे दिमाखात प्रकाशन करण्यात आले . कोकणची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आता घराघरांत पोहोचणार आहे. .आदिनारायण दिनदर्शिका ही केवळ तारखांचे साधन नसून ती कोकणच्या लोककला, सण-उत्सव आणि धार्मिक विधींची माहिती देणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानले जाते. कोकणातील प्रत्येक घरातील भिंतीवर या दिनदर्शिकेला मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने तिची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रतिपादन श्री.परब यांनी केले यावेळी व्यासपीठावर नाथा मडवळ, सुरेश ठाकूर, निकिता राऊळ, सुनील करलकर, विकास गवडे,भुषण देसाई, विशाल वेंगुर्लेकर विद्यमान सदस्य कोचरा,कास गावचे सरपंच प्रवीण पंडित,अमय पै, निखिल राऊळ हर्षद घोलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.