योग शिबिरात युवानेते संदिप गावडेंचा सहभाग
05:05 PM Jun 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सावंतवाडी राजवाडा येथे भारतीय जनता पार्टी सावंतवाडीच्या वतीने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदिप गावडे हे सहभागी झाले. योगाचे महत्त्व आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे. आरोग्य जपण्यासाठी योग फार महत्वाचा आहे . देशाचे पंतप्रधान मोदी यांनी योग दिन साजरा केला. आज संपूर्ण भारतामध्ये सर्वजण योग शिबिरात सहभागी झाल्याचे दिसते . त्याच पार्श्वभूमीवर आपण सुद्धा योग दिनानिमित्त आयोजित शिबीरीत सहभागी झालो असे यावेळी श्री गावडे यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement