For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वास्को येथील अपघातात युवक ठार, दोघे जखमी

04:22 PM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
वास्को येथील अपघातात युवक ठार  दोघे जखमी
Advertisement

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची रस्त्याखालील घराला धडक

Advertisement

वास्को : वास्कोत मांगोरहिल दाबोळी मार्गावर कारवरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर दोघेजण जखमी झाले. कार महामार्गावरून खोल दरीत कोसळली खाली असलेल्या घरांपर्यंत जाऊन धडकली. यामध्ये कारचाही चक्काचूर झाला. अपघातात मृत्यू आलेल्या युवकाचे नाव संज्योत बोरकर (19) असे आहे तर डॅविड क्रूझ (20) व सहर्ष भोसले (24) जखमी झाले असून सर्वजण नॉन मॉन खारवीवाडा वास्कोतील आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वऊणापुरी मांगोरहिल ते दाबोळी विमानतळ महामार्गावरील शांतीनगर भागात शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला. संज्योत, डॅविड व सहर्ष हे तिघेही मित्र असून माऊती स्विफ्ट कार घेऊन ते दाबोळीच्या दिशेने जात होते. डॅविड कार चालवत होता. शांतीनगर भागात पोहोचताच भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ रस्त्याच्या बाहेर जाऊन खाली कोसळली.

स्थानिक युवकांनी जखमींना काढले बाहेर

Advertisement

अपघात घडला तेथील रस्ता उंचावर आहे तर घरे रस्त्यापासून सखल भागात आहेत. कारने रस्त्याखालील झाडेझुडपे तुडवत तेथील एका घराला धडक दिली. त्यामुळे कारचा चककाचूर झाला. मध्यरात्री मोठा आवाज झाल्याने आसापासचे लोक धावत घटनास्थळी आले. कारची दशा पाहून लोकांना धक्का बसला. कारमध्ये चिरडलेल्या युवकांना त्यांनी दरवाजा तोडून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिघांनाही गोमेकॉमध्ये हलवण्यात आले.

गोमेकॉमध्ये संज्योत बोरकर याला मृत्यू आला. या अपघातातील कार चालक डॅविड किरकोळ जखमांवर बचावला. जखमी सहर्ष भोसले याची प्रकृती गंभीर आहे. वास्को पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावर युवकांकडून भरधाव वाहने हाकली जात असतात. बऱ्याचवेळा अपघातही घडत असतात. अशावेळी वाहनचालक दाऊच्या नशेतही असतात. शनिवारी रात्री झालेला अपघातात चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झाल्याचे सांगण्यात येते. नशेबाज आणि बेदरकारपणे वाहने चालवण्याच्या प्रकारामुळे महामार्ग शेजारी राहणाऱ्या लोकांमध्येही भीती व्यक्ते होत आहे.

Advertisement
Tags :

.