खानापुरात भीषण अपघातात युवक ठार
खानापूर :
येथील भगत मळा परिसरात पेट्रोल पंप व इंग्लिश स्कूल दरम्यान सकाळी नऊ वाजता मोटरसायकल व टाटा इंट्रा पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात युवक जागीच ठार झाला. दुचाकीवरील आयुष रवी धेंडे( वय 17 रा. खानापूर जि. सांगली) असे युवकाचे नाव असून कृष्णा संजय पाखरे (वय 17 रा. खानापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील दुचाकीने दिलेली धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील आयुष धेंडे जागीच ठार झाला. विजापूर गुहागर राष्ट्रीय मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून अमर्याद वेगामुळे अनेकांचे बळी चालले आहेत.
अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खानापूर येथील कृष्णा पाखरे व आयुष धेंडे हे हिरो डिलक्स एम.एच. 10 सी. सी 8404 या दुचाकीवरून विटा रस्त्यावरून खानापूर शहराकडे जात असताना खानापूर कडून विटाकडे जात असलेल्या टाटा पिकअप क्र.एम एच 45 ए.एफ. 6669 चालक सुरज तानाजी होवाळ रा. हातीद ता. सांगोला हा गाडीत मका बियाणे घेऊन विट्याकडे चालला होता. यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन यामध्ये आयुष रवी धेंडे हा जागीच ठार झाला तर कृष्णा संजय पाखरे हा गंभीर जखमी झाला. पेट्रोल पंप पासून जवळच भगत मळ्यात उतारावर हा भीषण अपघात झाला. अपघातात मोटरसायकलचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.
खानापूर पोलीस आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक सा†चन शेंडकर व टीमने दुस्रया एका तपासासाठी निघाले असता रोडवरील अपघात बघून जखमी कृष्णा पाखरेला पुढील उपचारासाठी सिध्दिविनायक हॉस्पिटल भिवघाट येथे पाठविले.
अपघातातील पिकअप चालक अपघातग्रस्त पिकअप घेवून तसाच विट्याकडे जात असताना पाठलाग करून पिकअप चालकाला पकडले. आयुष धेंडे व कृष्णा पाखरे दोघेही बारावी सायन्स मध्ये शिकत आहेत. गरीब कुटुंबातील आयुष धेंडे अपघातात ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खानापूर शहरातील गवळी टेक, पेट्रोल पंप ते खानापूर बस स्थानक हा उतरणीचा भाग असून सर्वच लहान मोठी वाहने नेहमीच भरधाव वेगाने जात येत असतात. या ठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. आ†धक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करत आहेत. पोलीस हवालदार महादेव चव्हाण,अनिल भोसले, सुहास चव्हाण, रमेश चव्हाण व पोलीस नाईक प्रशांत जाधव यांनी अपघातातील जखमीला तात्काळ उपचारासाठी दाखल केल्याने कृष्णा पाखरे याच्यावर लवकर उपचार होऊ शकले.