For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : जत येथे दारू न दिल्याच्या रागातून तरुणाचा बळी

03:22 PM Dec 23, 2025 IST | NEETA POTDAR
sangli crime   जत येथे दारू न दिल्याच्या रागातून तरुणाचा बळी
Advertisement

                                         जत तालुक्यातील कृषी बाजारात हृदयद्रावक खून

Advertisement

जत : जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारात नग्रावस्थेत मृत आढळलेल्या तरुणाच्या खुनामागचे कारण अखेर स्पष्ट झाले आहे. दारू देतो, असे सांगून प्रत्यक्षात दारू न दिल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अवघ्या काही दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

या प्रकरणात मृताची ओळख पटली असून त्याचे नाव विकास मलकारी टकले (वय २२, रा. टकलेवस्ती, उमदी, ता. जत) आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी रविंद्रआबासाहेब बंडगर (वय ३०) या वाहन चालकासह विराज संजय पांढरे (वय २०, दोघे रा. शिवाजी पेठ, जत) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.

Advertisement

जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर, तोंडावर व अंगावर गंभीर जखमा असल्याने तसेच मृतदेह नग्रावस्थेत आढळल्याने खुनाचा संशय बळावला.
या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने हाती घेतला. संशयितांचा माग काढण्यात आला.

आलेल्या तपासात समोर माहितीनुसार, संशयित व मृत हे जनावर बाजारात शेकोटीजवळ बसले होते. विकास टकले याने दारू देतो असे सांगून दोघांना दुकानापर्यंत नेले, मात्र प्रत्यक्षात दारू न दिल्याने वाद झाला.

या रागातून त्याला मोटारसायकलवरून जनावर बाजारात नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. शिवीगाळ झाल्यानंतर चिहून दगडाने डोक्यात मारून त्याचा खून करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. या घटनेने जतसह तालुक्यात खळबळ माजली होती. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.