For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेदरकार बसचालकाकडून युवकाचा बळी

11:06 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेदरकार बसचालकाकडून युवकाचा बळी
Advertisement

अपघाताची दृश्ये मोबाईलमध्ये कैद : मारिहाळ पोलिसात नोंद

Advertisement

बेळगाव : भरधाव बसखाली सापडून मेकलमर्डी, ता. बैलहोंगल येथील एक युवक जागीच ठार झाला. मुतगाजवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. या अपघाताची दृश्ये व बसचालकाचा बेदरकारपणा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिराप्पा शिवाप्पा बंगी (वय 31) राहणार मेकलमर्डी, ता. बैलहोंगल असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. दुचाकीवरून बेळगावहून मेकलमर्डीला जाताना मुतगाजवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. केए 25 एफ 3170 क्रमांकाचा बसचालक बसवराज सुतगट्टी, राहणार खणगाव याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तो बेळगावहून सांबऱ्याकडे जाताना बेदरकारपणे बस चालवत होता. अनेक वाहनचालकांनी पाठलाग करून बसचालकाला समज दिली होती. बसचालकाचा प्रताप पाहून हा कोणाला तरी आदळणार या संशयाने एका प्रवाशाने कारमधून बसचा व्हिडिओ काढत असतानाच हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला बिराप्पा हा बसचालकाला समज देत होता. त्यावेळी बसची धडक बसून तो बसखाली सापडला. तो जागीच ठार झाला. बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून बिराप्पाचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिराप्पाच्या एका भावाचा सहा महिन्यांपूर्वीच मेकलमर्डी क्रॉसजवळ अपघाती मृत्यू झाला होता. तर मधल्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.