For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा बळी

11:07 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा बळी
Advertisement

गांधीनगर उड्डाणपुलावर शहरात लागोपाठ दोघांचा मृत्यू : प्रशासनाला जाग येणार का?

Advertisement

बेळगाव : पतंग पकडताना दुसऱ्या मजल्यावरून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गळ्यात मांजा अडकून एका मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गांधीनगर उड्डाणपुलावर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. जीवघेण्या मांजाच्या विक्रीवर बेळगावात बंदी असतानाही पतंग उडविताना चिनी मांजाचा वापर होत असून या मांजाने एका तरुण विद्यार्थ्याचा बळी घेतला आहे. ध्रुव संतोष करजुनगी (वय 19) राहणार महांतेशनगर असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ध्रुव हा विद्यार्थी आपल्या मोटारसायकलवरून जात होता. गांधीनगर उड्डाणपुलावरून जाताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकून त्याचा गळा चिरला. रक्तबंबाळ अवस्थेत महामार्गाशेजारील रेलिंगला त्याची मोटारसायकल टेकली. तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी धामणे रोड, वडगाव येथील साद मंजूरअली टिनवाले (वय 9 वर्षे) या शाळकरी मुलाचा पतंग पकडताना दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळी मांजाने गळा चिरून तरुणाचा बळी गेला आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू झाला असावा, या समजुतीने वाहतूक उत्तर विभाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मांजामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.