For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधील माश्यांच्या हल्ल्यात जखमी तरुणाचे निधन

11:34 AM Apr 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
गांधील माश्यांच्या  हल्ल्यात जखमी तरुणाचे निधन
Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

Advertisement

मांगेली येथे  पाच दिवसांपूर्वी गांधील माश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले  रामदास गोविंद गवस (43) यांचे उपचारादरम्यान  गुरुवारी बांबोळी गोवा येथे निधन झाले.रामनवमी दिवशी रामदास गवस हे आपल्या काजूबागेत काजू गोळा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गांधील माशांनी हल्ला केला. माशांनी हल्ला केल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले.तेथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.