''त्या'' धाडसी तरुणांचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून सन्मान
सातार्डा-
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सातार्डा शाखेला रात्रीच्यावेळी शॉर्ट सर्किटने लागलेली आग पंचक्रोशीतील तरुणांनी पुढे सरसावून विझविल्याने सातार्डा शाखा वाचली आहे.अन्यथा आगीच्या वणव्याने शाखा जळून खाक झाली असती. तरुणांच्या धाडसाचे कौतुक आहे. असे प्रतिपादन सेंट्रल बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अक्षय जगताप यांनी केले. पंचक्रोशीतील धाडसी तरुणांच्या सन्मान सोहळ्यावेळी ते बोलत होते.यावेळी सेंट्रल बँकेच्या विभागीय व्यवस्थापिका ओलीविया परेरा,सातार्डा शाखा प्रबंधक शिवराज अकमर, श्री मंगेश, सहाय्यक व्यवस्थापक गणेश पाऊनियर,प्रशांत पुनाळेकर,रेश्मा राऊळ, ज्योती घाडी,सुरेखा पेडणेकर,सृष्टी राऊळ,शिपाई गजेंद्र उपस्थित होते.श्री जगताप पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात व गोवा राज्यात सातार्डा शाखा प्रगती पथावर आहे. ग्रामीण भागातील शाखेची उलाढाल समाधानकारक आहे. अशी सेंट्रल बँकेची सातार्डा शाखा वाचवीणाऱ्या तरुणांचा आम्हाला अभिमान आहे.सेंट्रल बँकेच्या सातार्डा शाखेला लागलेली आग विझविणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ,चंद्रशेखर प्रभू, संदेश सातार्डेकर, अक्षय पेडणेकर, जयेश तुळसकर,सोनेश सातार्डेकर,नितीन मांजरेकर, आत्माराम घाडी,यतीन घाडी,वैभव सातार्डेकर, साईल पेडणेकर,प्रथमेश पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ, दादा घाडी यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलेआभार विभागीय व्यवस्थापिका ओलीविया परेरा यांनी मानले.