For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विषारी औषध प्राशन करुन वेत्येत तरुणाची आत्महत्या

विषारी औषध प्राशन करुन वेत्येत तरुणाची आत्महत्या
Advertisement

न्हावेली वार्ताहर : वेत्ये रस्तावाडी येथील राजन रामा गावडे (वय ४५) यांनी राहत्या घरी बंद खोलीत विषारी औषध प्राशन करूनआत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास घरातून औषधाचा तीव्र वास येत असल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला; मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडून आत पाहिले असता राजन हे मृत अवस्थेत आढळले.
या घटनेबाबत संदीप गावडे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राजन यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.त्यांच्या पश्चात आई, मुलगा, भाऊ, भावजय आणि पुतणे असा परिवार आहे.
घटनेची बातमी पसरताच वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. राजन यांच्या अचानक जाण्याने वेत्ये परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.