For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यातील महिलेच्या खून प्रकरणी शिरशिंगेतील तरुण ताब्यात

01:03 PM May 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
गोव्यातील महिलेच्या खून प्रकरणी शिरशिंगेतील तरुण ताब्यात
Advertisement

डिचोली - गोवा

Advertisement

चिकणे कुडणे साखळी येथील शैला संजय घाडी या (58) वर्षीय महिलेचा जबर मारहाण करून खून केलेल्या संशयित सागर रमेश राऊळ (34 ) रा .शिरशिंगे -मळईवाडी ता.सावंतवाडी याला डिचोली पोलिसांनी वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मीरा-भाईंदर येथील गुन्हे शाखा युनिट चार पोलिसांच्या मदतीने बुधवार 20 मे रोजी सायंकाळी अटक केली. संशयित सागर राऊळ याने शैला यांच्यासमोर तिच्या धाकट्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव फेटाळल्याने सागर याने थेट तिच्या आईचाच काटा काढला. अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. मंगळवार 19 मे रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हा खूनाचा प्रकार घडला. खून करून फरार झालेल्या शिरशिंगे येथील सागर रमेश राऊळ या संशयिताला डिचोली पोलिसांनी अटक केली असून त्याला मीरा-भाईंदर ठाणे येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रांझिट रिमांडसाठी हजर करण्यात आले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला डिचोली पोलीस स्थानकात आणले जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.