For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj Crime : मिरजेतून चालणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये अडकले सांगली, कोल्हापूरचे तरुण

02:55 PM Nov 10, 2025 IST | NEETA POTDAR
miraj crime   मिरजेतून चालणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये अडकले सांगली  कोल्हापूरचे तरुण
Advertisement

     तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा संशय, शहर पोलिसात तक्रार दाखल

Advertisement

मिरज : सोशल मिडीया अकौंटवरुन तरुणांना जाळ्यात ओढत मिरजेतील एका भामट्या महिलेने हनीट्रॅपद्वारे लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत भामट्या महिलेच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील एका तरुणाने मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी संबंधीत महिलेच्या सोशलमिडीया अकाऊंटच्या प्रोफाईलवरुन गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत महिलेच्या हनीट्रॅपमध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही तरुण अडकल्याची चर्चा असून, या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेली संशयीत महिला ही शहरातील बखारभाग परिसरात राहण्यास असल्याचे समजते.

Advertisement

सदर महिलेने फेसबुक, इन्स्टा अशा सोशल मिडीयावर अकौंटवरुन तरुणांना रिक्वेस्ट पाठविली. तरुणांशी ओळख वाढवून हॅनीट्रॅपच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मिरजेतील फ्लॅटमध्ये बोलावून संबंधीत तरुणांसोबत फोटो काढले व त्यानंतर तेच फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन संबंधीत तरुणांकडे पैसे उकळल्याचा संशय आहे.

अशा प्रकारे संबंधीत महिलेने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह मिरज शहर व कर्नाटकातील चिक्कोडी, रायबाग आदी गावातील अनेक तरुणांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवले असल्याचा संशय आहे. दरम्यान, हनीट्रैप प्रकरणात महिला नेमकी कोण? याची ओळख पोलिसांनी उघड केली नाही. कोल्हापूरातील एक तरुण संबंधीत महिलेच्या जाळ्यात फसला आहे.

त्याने आजवर लाखो रुपये महिलेला दिल्यानंतर पोलिसात धांव घेतली आहे. कोल्हापूरातील तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधीत महिलेच्या सोशल मिडीया प्रोफाईलची शहानिशा केली आहे. सदर प्रोफाईलवरुन गुन्हा दाखल केला असून, पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारे हनीट्रै पमध्ये अन्य कोणी अडकले असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

Advertisement
Tags :

.