For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबऱ्यातील युवकाला 99 हजाराचा गंडा

06:36 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांबऱ्यातील युवकाला 99 हजाराचा गंडा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला एपीके फाईल पाठवून त्याच्या बँक खात्यातील 99 हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सांबरा येथील चेतन बी. आर. या 33 वर्षीय युवकाने शहर सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली आहे. 18 ऑगस्ट रोजी दुपारी सॉफ्टवेअर अपडेट करताना 20 मिनिटांसाठी त्यांचा मोबाईल बंद झाला. हँग झाल्यामुळे तो लवकर सुरू झाला नाही. 20 मिनिटांनंतर त्यांनी आपला मोबाईल सुरू केला असता एपीके फाईलच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी हडप केल्याचे निदर्शनास आले. सायबर क्राईम विभागातील अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.