गिरी येथे अपघातात पेडणे येथील युवक ठार
त.भा. प्रतिनिधी
म्हापसा : गिरी-बार्देश येथील ग्रीन पार्क जंक्शनवरील उ•ाणपुलावर इनोव्हा कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय दुचाकीस्वार श्रेयश श्रीपाद तेली (रा. पेडणे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. म्हापसा जिल्हा ऊग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर निथिन बालन हे आपल्या कारमधून पर्वरीहून पेडे-म्हापसाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी श्रेयश हा दुचाकीवरून त्याच दिशेने प्रवास करत होता. ग्रीन पार्क उ•ाणपुलावर दोन्ही वाहने धडकली आणि श्रेयश रस्त्यावर फेकला गेला. इस्पितळात उपचार घेत असताना पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मावळली. मयत युवक हा पोलिस हवालदाराचा मुलगा आहे. अपघाताची माहिती मिळताच साळगाव पोलिस उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर व हवालदार सुदेश मापारी यांनी घटनेचा पंचनामा कला. शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घडल्यानंतर डॉ. निथीन यांनी श्रेयशला आपल्या गाडीत घालून इस्पितळात आणले. त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. अपघातात श्रेयशचे डोके मधोमध डिव्हायडरला आपटले व तो सुमारे 20 मीटर लांब फरफटत पुढे गेला. त्यानंतर तो उभा राहिला खरा मात्र तेथेच रस्त्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच श्रेयशचे पेडणे व पणजी पर्वरी येथील मित्र परिवार म्हापसा जिल्हा इस्पितळात जमा झाले. श्रेयश पर्वरी येथील नेक्सा शोरूममध्ये मार्केटिंगमध्ये होता. शुक्रवारी एका मित्राचा वाढदिवस असल्याने सर्व स्टाफ वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते. वाढदिवस संपल्यानंतर घरी परतताना हा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. एक मनमिळावू स्वभावाचा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.